“पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महाखोटं बोलतात”, कोणी केली टीका?
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह बीआरएसवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार मुक्त देश घडवण्याची भाषा वापरतात आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार केलेल्यांना पक्षात घेऊन मंत्री पद देण्याचं काम करताहेत.
सोलापूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह बीआरएसवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार मुक्त देश घडवण्याची भाषा वापरतात आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार केलेल्यांना पक्षात घेऊन मंत्री पद देण्याचं काम करताहेत. भाजपकडे अशी कोणती वॉशिंग मशिन आहे, की भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेतलं की त्याचे भ्रष्टाचार साफ होतात? नेत्यांना पैसे देऊन भाजप खरेदी करतंय. जनतेमधून निवडून आलेलं हे सरकार नसून खरेदीवालं सरकार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बीआरएसची कसलिही जादू चालणार नाही. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीबाबत आलेल्या सर्व्हेचा मी आदर करतो, मात्र निवडणुकीच्या मतदान व निकालातून जनतेचं खरं चित्र दिसेल.कर्नाटक निवडणुकीच्या विजयानंतर आमचा आत्मविश्वास वाढला असून आम्हाला महाराष्ट्रात यश मिळेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महाखोटं बोलण्याचं काम करीत आले आहेत,” असं सिंह म्हणाले.