“…तर मी राजकीय संन्यास घेईन”, जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांवर दिलीप बनकर आक्रमक
शरद पवार गटाचे प्रदोत जितेंद्र आव्हाड यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्राचा हवाला देत गंभीर आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांना आमदार दिलीप बनकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : शरद पवार गटाचे प्रदोत जितेंद्र आव्हाड यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्राचा हवाला देत गंभीर आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांना आमदार दिलीप बनकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना असं कोणतंही पत्र मी दिलेलं नाही, जितेंद्र आव्हाड हे धादांत खोटं बोलत आहेत. मी असा कोणताही मजकूर पत्रात लिहिलेला नाही. शरद पवार माझे दैवत आहेत. माझ्या दैवतामध्ये आणि माझ्यामध्ये काहीजण फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार कुटुंबीय माझ्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत राहतील. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या एक तरी सहीच पत्र दाखवावं तर मी या संपूर्ण राजकारणातून संन्यास घेईल. जर त्यांनी असं पत्र दाखवलं नाही तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असं माझं प्रति आव्हान आहे.”
Published on: Jul 05, 2023 10:01 AM
Latest Videos