Dilip Valse Patil | मेटे यांच्या रुपाने राज्यातील लढाऊ नेतृत्व हरपलं, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
Dilip Valse Patil | विनायक मेटे यांच्या रुपाने राज्यातील लढाऊ नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Dilip Valse Patil | विनायक मेटे (Vinayak Mete Accident Death) यांच्या रुपाने राज्यातील एक लढाऊ नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil ) यांनी दिली. आज सकाळी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीच्या बैठकीसाठी (Maratha Reservation Meeting) ते येत होते. दरम्यान बातल बोगद्यात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीचा वाहक बचावला असला तरी मेटे यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची आता चौकशी करण्यात येत आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करत मेटे यांनी स्वतःला सिद्ध केले. मराठा समाजाचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडल्याची प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली. तसेच उमद्या वयात त्यांना काळाने हिरवल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नेत्यांनी मेटे यांच्या अकाली निधनाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.