शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतुद करण्याची गरज- दिलीप वळसे पाटील
राज्यामधला शेतकरी, कष्टकरी हा फार अडचणीमध्ये आहे. त्याला मदत होण्याची आवश्यकता असल्याचे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आता सादर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्याच्याआधीच काही न बोलणं बर म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी बजेट संदर्भात आपली अपेक्षा व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच बजेट असला तरिही त्यांनी बजेट सादर केलेला होता. त्यामुळे आमची एकच अपेक्षा आहे की, राज्यामधला शेतकरी, कष्टकरी हा फार अडचणीमध्ये आहे. त्याला मदत होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी अशी ठोस आर्थिक तरतूद करण अपेक्षित आहे. मात्र सरकारचा रोख हा फक्त पुणे, मुंबई या शहरांकडे दिसत आहे. त्याच्यासाठीच मोठे मोठे कर्ज काढून व्याजाला पैसा खर्च केला जात आहे. मात्र ग्रामीण भागाकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या भागाकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.