Video : राज्यातील काही संघटना दंगली घटविण्याच्या प्रयत्नात- दिलीप वळसे पाटील

Video : राज्यातील काही संघटना दंगली घटविण्याच्या प्रयत्नात- दिलीप वळसे पाटील

| Updated on: Apr 19, 2022 | 4:50 PM

राज्यातील सर्व पोलिसांना गृह विभागानं (Home Department) अलर्ट दिलाय. पोलिसांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी ही माहिती दिलीय. राज्यातील वातावरण अशांत करण्याचा काही घटकांकडून प्रयत्न सुरु आहे. पण स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कुठेही समाजा-समाजात संघर्ष होणार नाही, याची काळजी आम्ही घेतो. तीन मेबाबत इंटेलिजन्सकडून (Intelligence) सांप्रदायिक तणाव होणार अशी […]

राज्यातील सर्व पोलिसांना गृह विभागानं (Home Department) अलर्ट दिलाय. पोलिसांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी ही माहिती दिलीय. राज्यातील वातावरण अशांत करण्याचा काही घटकांकडून प्रयत्न सुरु आहे. पण स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कुठेही समाजा-समाजात संघर्ष होणार नाही, याची काळजी आम्ही घेतो. तीन मेबाबत इंटेलिजन्सकडून (Intelligence) सांप्रदायिक तणाव होणार अशी माहिती आहे का?, असं विचारलं असता दिलीप वळसे पाटील म्हणाले, इंटेलिजन्सकडून असे इनपूट येत असतात. आज तरी तसं काही घडेल असं वाटत नाही. तीन तारखेला तणावाच्या शक्यतेबाबत आज पोलीस महासंचालक (Director General of Police) यांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्या मी डीजी सोबत बैठक घेणार आहे. डीजी किंवा पोलीस आयुक्तांकडे इनपूट येत असतात. याबाबत डीजींसोबत उद्या चर्चा करेन. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तणाव झाल्यास काय होईल, याचा अभ्यास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

Published on: Apr 19, 2022 04:50 PM