नितीन देसाई यांच्या प्रकरणात मोठी अपडेट, एडलवाईस कंपनीच्या चेअरमनची न्यायालयात धाव
तर नितीन देसाई यांच्यावर 250 कोटींच कर्ज असल्याने तर ज्यांनी कर्ज दिले त्यांनी दबाव टाकल्यानेच देसाई यांनी आत्महत्येचं पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. तर त्यावरून देसाई यांच्या कुटूंबाने देखील त्यावरून आरोप केले आहेत.
रायगड, 8 ऑगस्ट 2023 | कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निराशेतून काही दिवसांपुर्वीच आत्महत्या केली होती. त्यानंतर यावरून अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तर नितीन देसाई यांच्यावर 250 कोटींच कर्ज असल्याने तर ज्यांनी कर्ज दिले त्यांनी दबाव टाकल्यानेच देसाई यांनी आत्महत्येचं पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. तर त्यावरून देसाई यांच्या कुटूंबाने देखील त्यावरून आरोप केले आहेत. यानंतर देसाई यांच्या पत्नी नेहा यांच्या फिर्यादीवरून कर्ज कंपनी ईसीएल फायनान्स आणि एडलवाईससह 5 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तर आज या सर्वांना रायगड पोलीसांनी चौकशीसाठी कागदपत्र घेऊन हजर राहण्याच्या नोटीशी पाठवल्या होत्या. या एफआयआरमध्ये एडलवाईस एआरसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर.के. बन्सल, संचालक रासेश शाह, स्मित शाह, केयूर मेहता आणि जितेंद्र कोठारी यांचा समावेश आहे. याचदरम्यान आता नवीन अपडेट समोर येत असून एडलवाईसचे संचालक रासेश शाह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे.