Aditya Thackeray | महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे, आदित्य ठाकरे यांची पुन्हा टीका
Aditya Thackeray | महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरु असल्याची टीका शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Aditya Thackeray | महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरु असल्याची टीका शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे. कुलाब्याच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी चंदनवाडीच्या गणपतीचे दर्शन घेतले. ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील विविध मानाच्या गणपतींचं दर्शन घेतले आहे. राज्यात गटतटाचे राजकारण सुरु आहे. राज्यात घोडे बाजार माजला आहे. आमदार खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील राजकारण (Politics) अत्यंत गलिच्छ सुरु असल्याची टीका त्यांनी केली. तसेच शिवसेनेने एकाचवेळी पाठीवर 40 वार खाल्याची बोचरी टीका ही त्यांनी केली. हा जो दगा देण्यात आला, पाठीत खंजीर खूपसण्यात आला हे उभ्या महाराष्ट्राने (Maharashatra)पाहिले. राज्यातील जनता शिवसेनेच्या पाठिशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यांना चांगल राजकारण करायचे आहे. स्वच्छ राजकारण हवे आहे, अशी सर्व मंडळी शिवसेनेसोबत असल्याचा दावा त्यांनी केला.