जरांगे आणि हाकेंशी वेगवेगळ्या चर्चा कशाला ? शरद पवार यांचा सरकारला सवाल

जरांगे आणि हाकेंशी वेगवेगळ्या चर्चा कशाला ? शरद पवार यांचा सरकारला सवाल

| Updated on: Jul 27, 2024 | 3:02 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आरक्षण प्रकरणात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. यावेळी आपण त्यांना जरांगे आणि हाके यांच्या स्वतंत्रपणे चर्चा न करता सर्वांना एकत्र बोलावून या विषयावर तोडगा काढावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे

राज्य सरकारच्या मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बोलावलेल्या बैठकीला ऐनवेळी विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याने राज्य सरकारने शरद पवार यांच्यावर टिका केली होती. अचानक कुणाचा तरी फोन आला आणि या बैठकीवर बहिष्कार झाल्याचा आरोप सरकारने केला. हा फोन शरद पवार यांचा होता असा अप्रत्यक्ष आरोप सरकारने केला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची एक बैठक झाली. या बैठकीत सरकारला का सल्ला दिला असा प्रश्न केला असता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की जरांगे यांना विरोध करणारे सरकारमधील मंत्री ओबीसींचे नेते हाके यांनी स्वतंत्रपणे भेटतात. यामुळे विनाकारण गैरसमज निर्माण आहेत. त्यापेक्षा जरांगे, हाके आणि छगन भुजबळ या मंडळीशी एकत्र भेट घ्यावी माझा सल्लाही घ्यावा त्यानंतर सर्वानुमते निर्णय घ्यावा असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

Published on: Jul 27, 2024 02:53 PM