राधाकृष्ण विखे पाटील लवकरच मुख्यमंत्री होणार? स्वतः विखे पाटलांकडून खुलासा

| Updated on: Apr 11, 2023 | 5:43 PM

VIDEO | राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळयात पडणार मुख्यमंत्री पदाची माळ ? चर्चांना उधाण, स्वतः विखे पाटील म्हणतात...

अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठ प्रस्थ. राज्याचे राजकारणातही त्यांच नाव आघाडीवर आहे. कॉंग्रेसमध्ये असताना परिवहन, कृषी आणि पणन, विधी आणि न्याय तसेच शालेय शिक्षणमंत्री अशी विविध मंत्रीपदे भुषवली आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांंनी काम पाहिलंय. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने ते सातव्यांदा निवडून आले आहेत. मात्र आता महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळयात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याच्या चर्चांना सोशल मिडियावर उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यास शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरळ स्वभावाच्या माणसाचा बळी घेतला अशी चिकलफेक होवू नये यासाठी पुढील निवडणुका ध्यानात घेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार अशा चर्चांना सोशल मिडीयावर उधाण आलंय. मात्र मला बदनाम करण्याच हे षडयंत्र असून या चर्चा कल्पोकल्पित असल्याचा खुलासा विखे पाटील यांनी केला आहे.

Published on: Apr 11, 2023 05:43 PM
सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?
मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदारांमध्ये नाराजीचे सूर?, संजय शिरसाट स्पष्टच बोलले