Thackeray vs Shinde | ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरुन शिंदे-ठाकरेंच्या समर्थकांमध्ये राडा
ठाण्यातील शिवाईनगर शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. याच्याआधीही ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद
ठाणे : राज्यातील सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने निकाल दिला. खरी शिवसेना ही आमचीच म्हणणाऱ्या शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं. त्यानंतर राज्यातील शिवसेनेच्या असणाऱ्या शाखांवर शिंदे गट हक्क सांगणार काय? त्या शाखांवर हक्क सांगत त्या ताब्यात घेणार काय? याकडे तमाम शिवसैनिकांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं. शिमग्याच्या तोडावर यावरून आज ठाण्यात ठिणगी पडली आणि शिंदे गट ठाकरे गट आमने सामने आला आहे. ठाण्यातील शिवाईनगर शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. याच्याआधीही ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. आता शिवाईनगर शाखेवरून वाद झाला असून शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपआपसात भिडले आहेत.
Published on: Mar 06, 2023 08:59 PM
Latest Videos