Special Report | ‘राज’सभेवरुन Shivsena-MNS मध्ये वार पलटवार

| Updated on: Apr 22, 2022 | 10:01 PM

पोलिसांकडून सभेला गरवारे स्टेडियमचा पर्याय सुचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानासाठी मनसे ठाम आहे. त्यामुळे प्रशासन यातून काय मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला 10 दिवस बाकी आहेत. तर सभेला विरोधही होत आहे मात्र आता औरंगाबाद पोलिस सभेची तारीख बदलण्यास सांगत आहेत. रमजान ईदनंतर 3 मे रोजी मनसे सभा घ्यावी असे औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास सभेची तारीख बदलण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे. पोलिसांकडून सभेला गरवारे स्टेडियमचा पर्याय सुचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानासाठी मनसे ठाम आहे. त्यामुळे प्रशासन यातून काय मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.