ठाण्यातील ज्ञानसाधना भुयारी मार्ग खुला, ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा

ठाण्यातील ज्ञानसाधना भुयारी मार्ग खुला, ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा

| Updated on: Aug 01, 2023 | 1:50 PM

ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू व्हावा यासाठी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत होते. या नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. वागळे इस्टेट, कोपरी आणि नौपाडा परिसरातील वाहतूकीसाठी पुर्व द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

ठाणे, 01 ऑगस्ट 2023 | ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू व्हावा यासाठी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत होते. या नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. वागळे इस्टेट, कोपरी आणि नौपाडा परिसरातील वाहतूकीसाठी पुर्व द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी भागात पुल होता. या पुलावरील रस्ता अरुंद असल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली.

Published on: Aug 01, 2023 01:49 PM