शिरूरमध्ये कोल्हे की लांडे संघर्ष मिटला? शिरूरची दार कोणासाठी उघडली? कोणाचं तिकीट कंफर्म
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या लोकसभेसाठी दंड थोपटले होते. त्यांनी या जागेवर दावा केला होता. तर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीसाठी नकार दिला होता. त्यामुळे येथे काय होणार कोणाला तिकिट मिळणार याची चर्चा शिगेला पोहचली होती.
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या उमेदवारीवरून पुन्हा चर्चेत आला होता. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या लोकसभेसाठी दंड थोपटले होते. त्यांनी या जागेवर दावा केला होता. तर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीसाठी नकार दिला होता. त्यामुळे येथे काय होणार कोणाला तिकिट मिळणार याची चर्चा शिगेला पोहचली होती. याचदरम्यान कोल्हे यांनी ‘शर्यत अजून संपलेली नाही; कारण मी अजून जिंकलेलो नाही’ असे स्पष्ट करत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच पहायला मिळत होती. याचदरम्यान आता ही रस्सीखेच थांबली असून येथील घोळही मिटल्याचे कळत आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नावचं पक्क केलं आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभा निवडणुकीत कोल्हे हेच उमेदवार असणार आहेत. त्यांचे तिकीट कंफर्म झालं आहे.