कुत्रा, लांडगा, कोल्हा की वाघ? तुमची शेपटी कोणत्या प्राण्याची? भुजबळ यांना कुणी दिला इशारा?
भुजबळ यांची शेपटी कशी ते माहित नाही. ते कुठल्या प्राण्यात मोडतात. कुत्रा, वाघ, लांडगा, की कोल्हा हे त्यांनी सांगावे. आम्हाला कुठे आणि कशी शिकार करायची आहे ते बरोबर कळते. जरांगे पाटील यांना कुणी डिवचले तर त्याला सोडणार नाही. आमचा नाद करू नका.
सातारा | 18 नोव्हेंबर 2023 : छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्यावरून मराठा समाजाच्या रडारवर मंत्री भुजबळ आले आहेत. माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तर भुजबळ तुमची शेपटी कोणती असा जळजळीत सवाल केलाय. मंत्री भुजबळ यांनी विविध पदांवर काम केले आहे. बऱ्याच वेळा त्यांनी मराठ्याचे सहकार्य घेण्याची भाषा केली. पण कालच्या सभेत त्यांची जीभ घसरली. भुजबळ पहिल्यापासून मराठाद्वेषी आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात त्यांचे वागण बोलणे आम्ही पाहिले आहे, असे ते म्हणाले. जरांगे हे मराठा नेते आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. प्रत्यक्षात जरी नाही तरी आम्ही पाटील यांच्यासोबत आहोत. मराठा आमदार त्यांच्या पाठी आहे. त्यामुळे भुजबळ यांनी त्यांना कमी लेखू नये, असा इशाराही त्यांनी दिला.