सोलापूर पाठोपाठ आता ‘या’ जिल्ह्यात लावलं गाढवाचं लग्न; श्रद्धेपोटी केला प्रकार, तर लग्नाची होतेय चांगली चर्चा
काहीच दिवसांपुर्वी सोलापूर जिल्ह्यात मान्सून रखडल्याने वरुण राजाला साकडे घालण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावले. तर मुसळधार पाऊसासाठी प्रार्थना केली होती.
कोल्हापूर, 18 जुलै 2023 | याच वर्षी जिल्ह्यातील उत्तूर या गावात वळीव पावसाने दडी मारल्याने गावकऱ्यांनी बेडूक व बेडकीचे लग्न लावून त्यांची गाढवावरून मिरवणूक काढली होती. यानंतर पंचक्रोशीत याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर काहीच दिवसांपुर्वी सोलापूर जिल्ह्यात मान्सून रखडल्याने वरुण राजाला साकडे घालण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावले. तर मुसळधार पाऊसासाठी प्रार्थना केली होती. मैंदर्गी गावात ग्रामस्थांनी गाढवाचे लग्न लावून गावात वरात काढली होती. याची चर्चा राज्यभर होत आहे. याचदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे आमदार आणि नुकतान नामदार झालेले हसन मुश्रीफ यांनी पावसासाठी गाढवाचं लग्न लावा असं म्हटलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातील तामगाव गावामध्ये गाढवाचं लग्न पार पडलं आहे. तर पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात असा प्रकार पहिल्यांदाच होत असल्याने याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरला यावेळी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. पावसाळा अर्ध्यावर आला तरी अपेक्षित पाऊस नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुबलक पाऊस पडावा यासाठी तामगाव गावामध्ये गाढवाचं लग्न लावण्यात आलं. गाढवाचं लग्न लावल्यानंतर भरपूर पाऊस पडतोय या श्रद्धेपोटी पारंपारिक पद्धतीने मंगलाष्टक असं अक्षतारूपण करत हे लग्न लावण्यात आल. इतकच नाही तर या गाढवाची धनगरी ढोलसह वाद्यावर संवाद्य मिरवणूकही काढण्यात आली….