बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, सागर बंगल्याची भीती आम्हाला नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याची घोषणा करुन महायुतीला आव्हान दिले आहे. तसेच नवनीत राणा यांना पाडण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले आहे. यावर भाजपाचे नितेश राणे यांनी सागर बंगल्यावरुन फोन आलेला नाही. एक फोन येताच बच्चू कडू यांचा बंड शमेल असे म्हटले आहे. त्यावर बच्चू कडू यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
नांदेड : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीत राहूनही अमरावती येथून भाजपाच्या नवनीत राणा यांच्या विरोधात लोकसभेसाठी उमेदवार उभा केलाआहे. अमरावतीतून दिनेश बूब यांना तिकीट देण्याचा निर्णय कडू यांनी घेतला आहे. बच्चू कडू यांनी आपण आता माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सागर बंगल्यावरुन आदेश आला तर बच्चू कडू याचं वादळ शमेल असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी नितेश राणे सारखा हलक्या कानाचा माणूस कोणी नाही. त्यांनी मोदीची उघडी पोस्ट व्हायरल केली होती. ब्रह्मदेव जरी खाली आला ना, तरी बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही. नितेश राणेचा असेल. आमचा बाप शेतकरी आहे. आम्हाला थांबविण्याची ताकद भारतात तरी कोणत्या नेत्याकडे नाही असे प्रत्त्युत्तर बच्चू कडू यांनी दिले आहे. विजय शिवतारे यांनी बंड केले होते ते आता थांबले आहे. बच्चू कडू थांबणार का ? असे विचारता त्यांनी ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आता बच्चू कडूला कोणी थांबवू शकत नाही असे बच्चू कडू म्हणाले.