Shinde Fadnavis Government : मुळात हे सरकारच घटनाबाह्य; शिवसेना नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Shinde Fadnavis Government : मुळात हे सरकारच घटनाबाह्य; शिवसेना नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Apr 14, 2023 | 9:23 AM

आदित्य ठाकरे यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्सवाचे वातावरण आहे. जयंती साजरी करत असताना देशात संविधानाला धोका निर्माण झाला आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे उत्तर हे हो आहे

मुंबई : बीड चाळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुषमा अंधारे, सचिन अहिर यांच्यासह अन्य पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी गेले होते. यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्सवाचे वातावरण आहे. जयंती साजरी करत असताना देशात संविधानाला धोका निर्माण झाला आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे उत्तर हे हो आहे. कारण आज संविधानावरच आघात होताना दिसत आहे. त्यामुळेच आम्ही मविआतील सर्वजण लढत आहोत. वज्रमुठ घेऊन हीच थीम पुढे महाराष्ट्रात आणि देशात घेऊन जात आहोत असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तर यावेळी पुन्हा एकदा हे सरकार घटनाबाह्य असून त्याविरोधातच आम्ही लढत आहोत आणि हे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तर आमचं सर्वात प्रथम काम हे हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि तरुण-तरुणींच्या हाताला काम देणं आहे.

Published on: Apr 14, 2023 09:16 AM