डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
आर्थिक उदारीकरणातून देशाचा विकास करणारे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे गुरुवारी 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाला मंदीच्या आर्थिक संकटातून वाचविणारा अर्थव्यवस्थेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळांवर आणणारा थोर अर्थतज्ज्ञ आणि मृदूभाषी राजकारणी गमावला आहे अशाच प्रतिक्रीया सर्वस्तरातून उमटल्या आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाची कवाडे उलगडून देणारे द्रष्टे नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते. त्यांच्यावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पार्थिवाला तिन्ही दलातर्फे सलामी देण्यात आली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पांजली वाहीली. मनमोहन सिंग ते 2004 ते 2014 पर्यंत सगल दहा वर्षे ते पंतप्रधान राहीले होते. त्याआधी विदेश व्यापार विभागात आर्थिक सल्लागार,नंतर अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थ मंत्रालयाचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले होते. साल 1976 ते 1980 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि त्यानंतर 1982 ते 1985 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर म्हणून डॉ.मनमोहन सिंग यांनी काम केले.तत्कालिन अखंड हिंदूस्थानातील ( आताच्या पाकिस्थानमध्ये ) पंजाब राज्यात 26 सप्टेंबर1932 रोजी जन्मलेल्या मनमोहन सिंह यांनी साल 1948 मध्ये मॅट्रीक पास केले. पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले, त्यांनी 1957 मध्ये ब्रिटनच्या कॅब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्सची पदवी पहिल्या श्रेणीत मिळविली. त्यानंतर 1962 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डी.फिल केले. मनमोहन सिंग योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते.