VIDEO | ऐन पावसाळ्यात या धरणात पाणीच नाही? कुठं निर्माण झालाय पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न?
राज्यातील अनेक भागात पाऊसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पण सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यामुळे तालुक्यातील जनतेसह प्रशासनाच्या समोर मोठा गंभीर प्रश्न ठाठला आहे.
सोलापूर : 26 ऑगस्ट 2023 | राज्यात अनेक भागात गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला होता. ज्यामुळे अनेक धरनांमधील पाणी साठ्यात वाढ झाली होती. तर अनेक धरणे ही भरली होती. मात्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अजूनही पाऊस झालेल्या नाही. ज्यामुळे तेथील धरणं ही ऐन पावसाळ्यात कोरडी पडली आहेत. तर तेथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याची तहान भागवणारे धरण म्हणून कुरनूर धरणाची ओळख आहे. मात्र ऐन पावसाळ्यात ते कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरण कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर कुरनूर धरणात केवळ दहा ते पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत. संपूर्ण तालुक्याला आणि शेतीला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
जून महिन्यात पाऊस सुरू होणे अपेक्षित असताना, ऑगस्ट संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झालाय. यावर्षीचे अर्थकारण कोलमडेल की काय अशी भिती व्यक्त केली जातेय. मोठा पाऊस पडावा आणि धरण भरावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. तर पेरणीनंतर उगवून आलेल्या पिकांना आता पावसाची अत्यंत गरज आहे. जेवढा लवकर पाऊस पडेल तितक्या लवकर या खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.