दुष्काळी बीड जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचं उत्पादन
बीडच्या (Beed) परळी तालुक्यातील परचुंडी (Parchundi) गावातल्या एका तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक प्रयोग केलाय.
बीडच्या (Beed) परळी तालुक्यातील परचुंडी (Parchundi) गावातल्या एका तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक प्रयोग केलाय. या शेतकऱ्याने दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची (Strawberry)लागवड केलीय. आतापर्यंत केवळ थंड हवेच्या ठिकाणी येणार हे पीक दुष्काळी भागात देखील या शेतकऱ्याने पिकवले आहे. परचुंडी गावातील विश्वनाथ रुपनर या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात हा आधुनिक प्रयोग केलाय. दहा गुंठे शेतात सहा हजार रोपांची लागवड करून ही स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती त्यांनी करून दाखवलीय. यासाठी त्यांना 80 हजार रुपयांचा खर्च आलाय तर आतापर्यंत 1 लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. आणखी महिनाभर हे स्ट्रॉबेरीचे पीक येणार असून त्यातून त्यांना आणखी उत्पन्न मिळणार आहे.
Published on: Apr 01, 2022 01:54 PM
Latest Videos