Bhaskar Jadhav : जिथे जिथे भाजप तिथे तिथे कोरोनामुळे लोकांना प्राण गमवावे लागले- भास्कर जाधव

Bhaskar Jadhav : जिथे जिथे भाजप तिथे तिथे कोरोनामुळे लोकांना प्राण गमवावे लागले- भास्कर जाधव

| Updated on: Sep 16, 2022 | 1:18 PM

निष्ठा यात्रेच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. केंद्रातील भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांची कोरोना महामारीतही कोंडी करण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

रत्नागिरी : जिथे जिथे भाजप सरकार (BJP Government) तिथे तिथे कोरोनामुळे लोकांना प्राण गमवावे लागले, असं म्हणत शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते रत्नागिरीत (Ratnagiri Aditya Thackeray) बोलत होते. रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे यांचा आज एक दिवसाचा दौरा आहे. निष्ठा यात्रेच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. केंद्रातील भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी कोरोना महामारीतही कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मविआ सरकार आज पडेल, उद्या पडेल, सकाळी पडेल, संध्याकाळी पडेल, असे अंदाज भाजपच्या नेत्यांकडून वर्तवले जात होते, आणि केंद्रातील भाजप सरकारनेही महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

Published on: Sep 16, 2022 01:18 PM