घाटातून प्रवास करताना सावधान, दरड कोसळल्यामुळे दुचाकी स्वार जखमी; पर्यटकही अडकले?
Rain, rain trip, tourist, landslide, Kas plateau, Yavateshwar ghat, landslide, traffic jam, पाऊस, वर्षा सहल, पर्यटक, दरड कोसळणे, कास पठार, यवतेश्वर घाट, दरड, वाहतूक कोंडी
सातारा : गेल्या आठवड्यापासून राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांत आता पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. त्यामुळे घाटत आता वर्षासहलीसाठी पर्यटक बाहेर पडताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी दरड कोसळत असल्याचे समोर येत आहे. ज्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने सध्या कास पठाराकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. मात्र सततच्या पावसामुळे येथील यवतेश्वर घाटात अचानक दरड कोसळली. त्यामुळे घाटात दुतर्फा वाहतूक कोंडी होण्याबरोबरच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे कास कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारा दुचाकी स्वार देखील जखमी झाला आहे. शनिवार, रविवार असल्यामुळे कास पठारावर फिरण्यासाठी आलेले पर्यटक घाटामध्येच अडकले आहेत. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू असून यवतेश्वर घाटात वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.