उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावे लागले याची खंत- एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 02, 2022 | 2:05 PM

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी TV9 ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टीचा खुलासा केला. नेमकी शिवसेना कुणाकडे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी बहुमत आमच्याकडे आहे असे उत्तर दिले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहोत असेही ते म्हणाले. ज्या मित्र पक्षासोबत इतके वर्ष काम केले त्या पक्षाला सत्तेसाठी सोडून […]

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी TV9 ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टीचा खुलासा केला. नेमकी शिवसेना कुणाकडे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी बहुमत आमच्याकडे आहे असे उत्तर दिले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहोत असेही ते म्हणाले. ज्या मित्र पक्षासोबत इतके वर्ष काम केले त्या पक्षाला सत्तेसाठी सोडून दिल्याची खदखद अनेक आमदारांच्या मनात होती असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं याची खंत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अनेक प्रश्नांची उत्तरं ते योग्य वेळी देतील असेही ते म्हणाले.