सरकार आणि प्रशासनाची कुंभकरणाची झोप; पुरात बळीराजाचा जीवघेणा प्रवास सुरू, कुठं घडतयं असं?

सरकार आणि प्रशासनाची कुंभकरणाची झोप; पुरात बळीराजाचा जीवघेणा प्रवास सुरू, कुठं घडतयं असं?

| Updated on: Jul 24, 2023 | 1:40 PM

एकिकडे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पूर स्थिती निर्माण होत असताना विदर्भात देखील पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. येथे जनजीवन विस्कळीत झालं असून पुराचा सामना नागरिकांना करावा लागतोय.

चंद्रपूर, 24 जुलै 2023 | राज्याच्या अनेक भागात पावसाने हाहाकार केला आहे. तर राज्यातील मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने आता ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुराच्या भीतीने कोल्हापूरची जनता ग्रासली आहे. एकिकडे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पूर स्थिती निर्माण होत असताना विदर्भात देखील पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. येथे जनजीवन विस्कळीत झालं असून पुराचा सामना नागरिकांना करावा लागतोय. यादरम्यान आलेल्या पुरादरम्यान शेतातील खत आणण्यासाठी बळीराजाचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. शेती हंगाम सुरु होताच शेतीला लागणारे संपूर्ण खत शेतकरी शेतात नेवून ठेवतात. आता पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतं पाण्याखाली आली आहेत. शेतात पाणीच पाणी दिसू लागले आहे. खत पाण्याखाली आले तर ते पाण्यात विरघळून जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भर पुरातून खत वाचविण्यासाठी बळीराजाचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अडेगाव येथील शेतकरी जीवाची पर्वा न करता पुरातून नावेने खत आणत आहेत. मात्र याची कल्पना असूनही प्रशासनाकडून कोणताही मदतीचा हात मिळत नसून प्रशासन आणि सरकार गाढ झोपेचं सोंग घेत आहे. त्यामुळे बळीराजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Published on: Jul 24, 2023 01:40 PM