पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! चिपळूणमधील ‘या’ धबधब्यावर पर्यटकांना बंदी

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! चिपळूणमधील ‘या’ धबधब्यावर पर्यटकांना बंदी

| Updated on: Jul 25, 2023 | 9:01 AM

राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणजवळचा सवतसडा आणि निवळी घाटातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळत असते. तर गेला महिनाभर जिल्हाभरात मोसमी पावसाने पुर्ण दडी मारली होती. मात्र आता जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत केवळ १५ चं दिवसात जिल्ह्यात हाहाकार केला आहे.

रत्नागिरी | 25 जुलै 2023 : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच धबधबे ओसंडून वाहत आहेत. ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणजवळचा सवतसडा आणि निवळी घाटातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळत असते. तर गेला महिनाभर जिल्हाभरात मोसमी पावसाने पुर्ण दडी मारली होती. मात्र आता जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत केवळ १५ चं दिवसात जिल्ह्यात हाहाकार केला आहे. तर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील सवतसडा धबधबा पुर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे इकडे पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. येथे मुंबई, पुण्याहून व जिल्हा-परजिल्ह्यातून अनेक लोक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र आता होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक प्रशासनाने धबधब्यावर पर्यटकांना बंदीचा निर्णय घेतला आहे. तर हा धबधबा आज पासून पर्यटकांना बंद करण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने घेतला निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुरून आलेल्या पर्यटकांच्यांत या निर्णयामुळे नाराजी पसरली असून ते बोलून दाखवत आहेत.

Published on: Jul 25, 2023 09:00 AM