शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघताय! पण अनेक शिवप्रेमी माघारी फिरत आहेत? कारण काय?

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघताय! पण अनेक शिवप्रेमी माघारी फिरत आहेत? कारण काय?

| Updated on: Jun 06, 2023 | 10:23 AM

याचदरम्यान शिव भक्त मोठ्या प्रमाणावर आल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्वांच दर्शन होत नाही तोपर्यंत मी खाली जाणार नाही.

रायगड : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. सोहळ्याला जाण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी रायगडावर उसळली. त्यामुळे किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प आहेत. महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवलीय. त्यामुळे शिवप्रेमींची वाहनं परतीच्या मार्गावर आहेत. सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याने शिवप्रेमी नाराज आहेत. तर याचदरम्यान शिव भक्त मोठ्या प्रमाणावर आल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्वांच दर्शन होत नाही तोपर्यंत मी खाली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जेथे आहात तेथेच थांबा.

Published on: Jun 06, 2023 10:23 AM