अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी धोक्यात; सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचे संकट; उत्पादनही घटणार
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी अपेक्षित पाऊस पडत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. तर सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट पडले आहे.
अहमदनगर, 06 ऑगस्ट 2013 |राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने उसंत दिली आहे. मात्र राज्यात असे जिल्हे आहेत. जेथे अजुनही पावस पडलेला नाही. ज्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही सध्या पाऊस पडलेला नाही. ज्याचा थेट परिणाम सोयाबीन पिकावर झाला आहे. येथे जिल्ह्यात खरीप हंगामात साधारण 1 लाख 50 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. मात्र समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पिके संकटात सापली आहेत. आता सोयाबीनवर यलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव सगळीकडे बघायला मिळतोय. या रोगामुळे झाडे पिवळी पडली असून सोयाबीनला शेंगा येणार नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 06, 2023 02:59 PM
Latest Videos