मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; मध्य आणि पश्चिम रेल्वे उशीरा

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; मध्य आणि पश्चिम रेल्वे उशीरा

| Updated on: Jul 27, 2023 | 10:58 AM

कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर परिणाम झाला आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | कालपासून मुंबई मध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचू लागलं आहे. आज दुपारपर्यंत मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर झाला आहे. दोन्हीही मार्गांवरील वाहतुक सध्या धिम्या गतीने सुरु आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतुक सध्या 20 मिनिटांनी उशारानं सुरु आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Published on: Jul 27, 2023 10:58 AM