आगामी निवडणूक शरद पवारांशिवाय? ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन बी काय?
बंडानंतरही अजितदादांनी आत्तापर्यंत चार वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याच्या आधी घेतलेल्या तीन बैठकीवरून जेवढा गदारोळ आणि संभ्रम निर्माण झाला नाही तितका पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या गुप्त बैठकीने झाला आहे.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत शिवसेनेत जशी स्थिती निर्माण झाली तशीच स्थिती उभी केली आहे. अजित पवार यांनी बंड केलं त्याला जवळ जवळ दोन महिने होत आहेत. मात्र या मधल्या कळात बंडानंतरही अजितदादांनी आत्तापर्यंत चार वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याच्या आधी घेतलेल्या तीन बैठकीवरून जेवढा गदारोळ आणि संभ्रम निर्माण झाला नाही तितका पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या गुप्त बैठकीने झाला आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीतच मोठी खळबळ उडाली आहे. तर अशा गाठीभेटींमुळे शरद पवार गटाचं नेमकं काय चाललंय? असा प्रश्न ठाकरे गट आणि काँग्रेस करताना दिसत आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुका पाहता ठाकरे गट आणि काँग्रेसकडून शरद पवार यांनाच आता आघाडीच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे कळत आहे. तर आता आगामी निवडणुका या शरद पवारांशिवाय लढण्यासाठी आखणी देखील ठाकरे गट आणि काँग्रेसकडून केली जात आहे. तर याबाबत ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन बी सुद्धा तयार आहे अशी माहिती कळत आहे. त्यावर हा TV9चा special report…