Malegaon Flood | प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा खेळ, नागरिकांचा संताप

Malegaon Flood | प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा खेळ, नागरिकांचा संताप

| Updated on: Jul 21, 2022 | 12:20 PM

शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी पालकांसह,ग्रामस्थानी केले आहे.

नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातुन अश्या प्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज अशीच अवस्था आहे. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे एखादी घटना जीवावर बेतू शकते याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी पालकांसह,ग्रामस्थानी केले आहे.