सुदैवाने सकाळची शाळा असल्याने मुलं बचावली; अवकाळीचा फटका, पत्रेच उडून गेले
नाशिक जिल्ह्यासह देवळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ, वारा व पावसाचा धडाका मागील तीन चार दिवसांपासून सुरू आहे
नाशिक : राज्यातील अनेक भागांना अवकाळीचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यावर विरोधकांनी आवाज उठवला असून आज अर्थसंकल्पात त्यावर काही मदत होईल का याकडे लक्ष लागले आहे. तर याच अवकाळीचा फटका नाशकात शाळेला बसला आहे. नाशिक जिल्ह्यासह देवळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ, वारा व पावसाचा धडाका मागील तीन चार दिवसांपासून सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे येथील दहिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन खोल्यांचे पत्र उडून पडले. त्यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने सध्या मार्च महिना असल्याने सकाळची शाळा आहे दुपारी विद्यार्थी शाळेत नव्हते शाळा बंद होती, म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.
Published on: Mar 09, 2023 09:47 AM
Latest Videos