अमरावतीत पाणी टंचाईमुळे वार्डातील महिलांचा थेट गाव सोडण्याचा निर्णय
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात नेहमीच पाणी टंचाई असते.अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एक मध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा केला नसून गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात नेहमीच पाणी टंचाई (Water) असते.अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एक मध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा केला नसून गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा (Migration)निर्णय घेतला आहे.बुधवारी रात्रीपासून वार्ड नंबर एक मधील नागरीकानी गावापासून दोन किलोमीटर वर जाऊन ठिय्या मांडला आहे..या भागात तंबल २८ दिवसांपासून ग्रामपंचायत ने पाणी पुरवठाच केला नसल्याचा आरोप केला आहे..दरम्यान गावात टाकण्यात आलेल्या पाईप लाईन मूळे त्या भागात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.
Published on: Feb 03, 2022 11:19 AM
Latest Videos