महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घेण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक संघटनांसह राजकीय पाठिंबाही मिळत आहे. पण काही जागी संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. वसईच्या माणिकपूर पोलिस स्थानक परिसरात एका एसटी चालकाने बस चालवल्यामुळे त्याच्या तोंडाला काळं फासण्यात आलं.