Special Report | हनुमान नाही, देवदूत नाही तर एका बापाचं काळीज

Special Report | हनुमान नाही, देवदूत नाही तर एका बापाचं काळीज

| Updated on: Apr 28, 2022 | 8:16 PM

ण्यातील वारजे येथील पुलावर झालेल्या अपघातात जखमी चिमुरडीला वाहतूक पोलीस समीर बागसिराज यांनी नव संजीवनी दिली आहे. समीर बागसिराज यांनी केलेल्या मदतीचे आज सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पुणे : मुंबई-पुणे हायवेवरील (Mumbai-Pune highway) वारजे भागातील पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चारचाकी मोटारीला एका ट्रकने मागील बाजूने धडक दिली. या अपघातात मनोज पुराणिक, त्यांच्या पत्नी, दोन मुली या जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी (Traffic) झाली होती. या वाहतूककोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले खरे… पण गर्दी इतकी भयानक होती, की त्यांनादेखील हालचाल करणे शक्य होत नव्हते. पण या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागसिराज (Samir Bagsiraj) यांनी या आठ वर्षीय जखमी चिमुरडीला क्षणार्थात स्वत:च्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्यांच्या मदतीला राम नवले हे रिक्षाचालकही धावून आले. तिला वेळेत उपचार मिळाले.