Ajit Pawar News : अजित पवार आणि राष्ट्रवादीची सत्तेत एन्ट्री; भाजप अन् शिंदे गटात धुसफूस? लाड म्हणतात...

Ajit Pawar News : अजित पवार आणि राष्ट्रवादीची सत्तेत एन्ट्री; भाजप अन् शिंदे गटात धुसफूस? लाड म्हणतात…

| Updated on: Jul 03, 2023 | 4:16 PM

तर त्यांच्या नाराजीबाबत ही सतत चर्चांना उधान येत होतं. मात्र काल या उधाणाला उकली फूटली आणि अजित पवार थेट सत्तेच्या रेड कार्पेटवर गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला.

मुंबई : 2019 च्या फसलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्याबाबत भाजपप्रवेशाच्या सतत बातम्या येत होत्या. तर त्यांच्या नाराजीबाबत ही सतत चर्चांना उधान येत होतं. मात्र काल या उधाणाला उकली फूटली आणि अजित पवार थेट सत्तेच्या रेड कार्पेटवर गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून सध्या भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी यावर बोलताना, अजित पवार आणि राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं महाराष्ट्र अधिक बळकटीने काम करेल. त्यामुळे राज्यात कोणीही नाराज नाही. विकास आणि गतीने काम करेल असही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 03, 2023 04:16 PM