‘ईट का जवाब पत्थर से’, भाजपचं मिशन लोकसभा सुरू, घरोघरी करणार प्रचार
सामनाची आग ओकण्याची लिमीट संपलीय, त्यांचा पक्ष त्यांच्यामुळेच संपला. त्यांनी बेईमानी केली नसती, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर उद्धव ठाकरे यांचे हे हाल झाले नसते.
नागपूर : 19 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात 45 जागा निवडून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्याचा एक भाग म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्यापासून 28 लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. हा दौरा सुरु करण्यापूर्वी त्यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात संपर्क अभियान राबवलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवसभरात 20 पेक्षा जास्त गावाला भेटी देत घरोघरी जाऊन प्रचार केला. जनतेपर्यंत मोदी सरकारने केलेले काम पोहोचवण्याचा हा प्रयत्न असून 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी लोकांचे समर्थन मागतोय असे ते म्हणाले. सामना वृत्तपत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्ल जो लेख छापला आहे. त्यावर भाष्य करताना सामनातून वाट्टेल ते बोलतात. पण आता भाजप सहन करणार नाही. आता आम्ही मागे येणार नाही. आता कायदेशीर लढाई पण लढणार आणि ‘ईट का जवाब पत्थर से देणार’ असा इशाराही त्यांनी दिला.