ईडीच्या रडारवर आता किशोरी पेडणेकर; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी पेडणेकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेले तीन दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात ईडीने छापेमारी केली आहे. ईडीने जवळपास 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे ईडीने ठाकरे गटाशी संबंधितांवर कारवाई केल्याने खळबळ माजली आहे. ईडीने गेल्या तीन दिवसात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. सूरज चव्हाण यांना ईडीने सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी पेडणेकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 23, 2023 03:27 PM
Latest Videos