आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर धाड, नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ…
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली माहिती समोर आली आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली माहिती समोर आली आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास पाच अधिकाऱ्यांचं ईडीचं पथक सूरज चव्हाण यांच्या घरी दाखल झालं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. तसेच सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरी देखील ईडीचा छापा पडला आहे. संजीव जैसवाल हे कोरोना काळात हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. त्याच पार्श्वभूमीवर ही ईडीची धाड त्यांच्या घरी पडली आहे. कोरोनाच्या काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…