गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना चालवणाऱ्या ब्रिस्कवर ईडीचा छापा
याप्रकरणी ब्रिस्क कंपनीच्या पुण्यातील कंपनीवर देखील छापा टाकण्यात आला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आला होता. त्यानंतर हा हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला होता.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर आज त्यांच्या घरासह इतर तीन एक ठिकाणी ईडीने छापे टाकले. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचे हे प्रकरण असून या कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.
याप्रकरणी ब्रिस्क कंपनीच्या पुण्यातील कंपनीवर देखील छापा टाकण्यात आला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आला होता. त्यानंतर हा हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला होता.
विशेष म्हणजे ब्रिस्क इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. त्यामुळे कारखाना हस्तांतरीत करण्यासाठी केवळ बिस्क इंडिया कंपनीच कशी सापडली, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.
मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.या व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती. याच खात्यांच्या माध्यमातून मनी लाँडरींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.