हसिना पारकर यांच्या कुटुंबियांच्या घरी EDची छापेमारी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद (Dawood Ibrahim) माफियाविरुद्ध नुकत्याच नोंदवलेल्या खटल्यांच्या संदर्भात, ईडीने सोमवारी रात्री आणि मंगळवारी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सक्तीने शोध मोहीम राबवली.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद (Dawood Ibrahim) माफियाविरुद्ध नुकत्याच नोंदवलेल्या खटल्यांच्या संदर्भात, ईडीने सोमवारी रात्री आणि मंगळवारी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सक्तीने शोध मोहीम राबवली. अंमलबजावणी संचालनालयाचे काही अधिकारी आज दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर (Haseena Parkar) हिच्या घरी पोहोचले . हसीना पारकर यांचे निधन (Death)झाले आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर फरार असलेल्या दाऊदने पाकिस्तानात जाऊन आपला गुन्हेगारी समाज बनवला आणि तेथून भारतातही कारवाया केल्याचं बोललं जातंय.
Latest Videos