नितीन देसाई यांच्या मृत्युसंबंधी मोठी बातमी; एडलवाईज कंपनीचे सीईओ रॅशेस शाहांची चौकशी होण्याची शक्यता...

नितीन देसाई यांच्या मृत्युसंबंधी मोठी बातमी; एडलवाईज कंपनीचे सीईओ रॅशेस शाहांची चौकशी होण्याची शक्यता…

| Updated on: Aug 04, 2023 | 10:51 AM

नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी स्वतःचा जीवनप्रवास, एनडी स्टुडीओचा प्रवास, आलेल्या संकटांबद्दल ऑडिओमध्ये सांगितलं आहे. तसेच एडलवाईज कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई, ४ ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कालदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या एनडी स्टुडियोमध्ये जीवन संपवलं. आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे. नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी एडलवाईज कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर पोलीस चौकशी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी कंपनीचे सीईओ रॅशेस शाहांच्या चौकशीची मागणी केली. आहेय. त्यामुळे रॅशेस शाह यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published on: Aug 04, 2023 10:51 AM