‘कलंक’वाद; उद्धव ठाकरे यांच्यावर तरुण भारतच्या अग्रलेखातून सडकून टीका, ‘कर्तव्यशून्य’ असा उल्लेख

‘कलंक’वाद; उद्धव ठाकरे यांच्यावर तरुण भारतच्या अग्रलेखातून सडकून टीका, ‘कर्तव्यशून्य’ असा उल्लेख

| Updated on: Jul 12, 2023 | 2:36 PM

ठाकरे यांनी नागपूरमधील मेळाव्यातून फडणवीस यांच्या टीकेवर पलटवार केला होता. तर अजित पवार यांच्यावरील व्हिडिओ लावत नागपूरला कलंक असं म्हटलं होतं. त्यावरून राज्यात आता गदारोळ सुरू आहे.

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनी नागपूरमधील मेळाव्यातून फडणवीस यांच्या टीकेवर पलटवार करत अजित पवार यांच्यावरील व्हिडिओ लावत नागपूरला कलंक असं म्हटलं होतं. त्यावरून राज्यात आता गदारोळ सुरू आहे. भाजपने यावरून आक्रमक पवित्रा घेत ठाकरे यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. तर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. याचदरम्यान ठाकरे यांच्यावर आता तरुण भारतच्या अग्रलेखातून खरमरीत टीका करण्यात आली असून विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हटलं आहे. तर कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री म्हणत टोला मारण्यात आला आहे. तर 2019 चा उल्लेख करताना ठाकरे यांनी जनमताचा अनादर केला. त्यांनी लोकशाहीला कलंक लावला असेही यात म्हटलं आहे. तर फडणवीस यांनी कलंक म्हणणाऱ्या ठाकरेंनी स्वतःचा चेहरा आरसात पाहावा असा खोचक सल्ला देखील यावेळी अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Published on: Jul 12, 2023 02:28 PM