Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाची तयारी जोरात, गटनेता, प्रतोदनंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती, कोण होणार प्रवक्ता?
आता शिंदे गट आणखी सक्रिय झालाय.
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटाकडून संख्याबळावर वेगवेगळे दावा केले जातायत. आता शिंदे गट आणखी सक्रिय झालाय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून गटनेता, प्रतोद यानंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसतंय. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी दोन खासदार वगळता इतर सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याचा दावा केलाय. या सगळ्यात शिंदे गट आणखी सक्रिय झाला असून त्यांच्याकडून आता नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहेत. शिवसेनेनं आपल्याकडे 21 आमदार (MLA) असल्याचा दावा यापूर्वी केला होता. तर शिंदे यांच्यासोबत जवळपास 47 आमदार आहेत, असा दावा केला जातोय. यामुळे नेमके कुणासोबत किती आमदार, हा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. तर शिवसेनेनं बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला असून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.