Video: एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही- खडसे
एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही. नेमकं कळत नाही 50 आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली. म्हणजे त्यांनी शिवसेनेमधून पन्नास आमदार फोडले? बंडखोर आमदारांच्या माध्यमातून त्यांनी सरकार स्थापन केलं. ते काय बोलतात त्यांचा अर्थ कळत नाही,असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) म्हणाले आहेत. शिवाय भावनेच्या भरात जाऊन शिंदे सरकारने निर्णय घेणे आणि घोषित करणे […]
एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही. नेमकं कळत नाही 50 आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली. म्हणजे त्यांनी शिवसेनेमधून पन्नास आमदार फोडले? बंडखोर आमदारांच्या माध्यमातून त्यांनी सरकार स्थापन केलं. ते काय बोलतात त्यांचा अर्थ कळत नाही,असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) म्हणाले आहेत. शिवाय भावनेच्या भरात जाऊन शिंदे सरकारने निर्णय घेणे आणि घोषित करणे काही योग्य नाही. गोविंदा पथकाला पाच टक्के आरक्षण देणे कुठल्या आधारावर देणार आहे. अलीकडे नोकऱ्यांमध्ये काही आरक्षणाला निकष आहे ते राज्य सरकारने ठरवलेले आहे. काही शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय असणार आहे? क्रीडा विभागाचे काही नियम आहेत क्रीडा विभागाच्या मध्ये हा नियम बसत नाही. अन्य बाबींवर काय परिणाम होईल याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आरक्षण द्यायचं असेल तर काही निकष वेगळ्या मार्गाने दिले पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.