Special Report | दावे-प्रतिदावे, डिवचलं-सुनावलं; जळगावात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस भिडले!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल जळगाव दौऱ्यावर होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलं होतं. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.
जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल जळगाव दौऱ्यावर होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलं होतं. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर या आंदोलनावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनावेळी रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली. “जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळ केलं नसतं, तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती,” असं फडणवीस म्हणाले. याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी प्रत्युत्तरही दिलंय. या वादाची सुरुवात नेमकी कुठून झाली? एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय प्रत्युत्तर दिलं? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…