मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ खडसे यांचं मोठं विधान; म्हणाले, “तीन पायांच्या सरकारमध्ये…”
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर गेला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची शिवसेना आणि भाजपचे नेते आस लावून बसले आहेत. त्यात राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशात शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे.
जळगाव: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर गेला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची शिवसेना आणि भाजपचे नेते आस लावून बसले आहेत. त्यात राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशात शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “एक वर्ष उलटूनही शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी कोंडी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने तिसरा बिडू सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढलीय. आपल्याकडील मंत्रीपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील याची धास्ती शिंदे गटाला असल्याने मंत्रिमंडळात नव्याने सामील होणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.”