“माझाच फोन टॅप करण्याचं कारण काय?,” एकनाथ खडसे विधान परिषदेत कडाडले
पुन्हा एकदा फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरला. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल फोन टॅपिंग प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं.
मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शिवसेना नेते संजय राऊत आणि शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांचे फोन टॅप करण्यात आले होते. खडसे यांचा फोन 67 दिवसांपर्यंत राज्य गुप्तचर विभागाकडून टॅप करण्यात आला, असा खुलासा मुंबई पोलिसांच्यावतीने करण्यात आला होता. यानंतर फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी काल विधान परिषदेत सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, रश्मी शुक्लांनी माझा फोन टॅप केला, त्याचं पुढे काय झालं? माझाच फोन टॅप करण्याचं कारण काय होतं? मी देशद्रोही नव्हतो, कोणत्या कारणानं फोन टॅप केला? ज्यावेळी तुम्ही मला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यात क्लिनचीट दिली होती.”

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
