माहेरी आलेल्या मुलीला एकनाथ खडसे यांनी दिला अनोखा आशीर्वाद, उमेदवारालाही आलं गहिवरून
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज जळगावात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली.
जळगाव : विधानपरिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चच्या असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज जळगावात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. यावेळी नाथाभाऊंनी केलेल्या अनोख्या स्वागताने त्यांना गहिवरून आले.
बाळासाहेब थोरात यांच्यासोबत माझे बोलणे झाले. त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे. महाविकास आघाडीचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे आज खडसे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुक्ताईनगरात आले आहे.
माहेरी आलेल्या मुलीला काय दिलं पाहिजे ते त्यांनी लगेच केले. प्राचायर, शिक्षक यांना स्वतः फोन करून बोलवून घेतले. ते माझे भाऊही या बहिणीसाठी लगेच धावत आले. साहेबानी अंगावर शाल टाकत माहेरची साडी दिली. आई वडिलांकडून जो आशीर्वाद मिळाला हवा ती मला वडिलांकडून मिळाला, असे शुभांगी पाटील यांनी यावेळी सांगितले.
Latest Videos