‘मराठ्यांना जर कायमस्वरुपी आरक्षण द्यायचं असेल तर एकच मार्ग…’ काय म्हणाले एकनाथ खडसे
मराठा समाजाला कायम स्वरुपी टीकणारं आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. राज्य सरकारने जरी समाधानासाठी जीआर काढला तरी तो न्यायालयात टीकणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
जळगाव | 26 जानेवारी 2024 : मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणे अवघड असल्याचे सरकारने सांगितले आहे. सरकारनेच यासंदर्भात वारंवार आश्वासन दिले की सगे सोयऱ्याचं आरक्षण तुम्हाला मिळेल. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत लेख आश्वासन दिले आहे. ओबीसीमधून आरक्षण देऊ असे सरकार एका बाजूला म्हणतेय दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यायचे आहेत असे म्हणत आहेत. म्हणजे समाधानासाठी हा जीआर काढला असेल तर हा जीआर न्यायालयात टिकणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठ्यांना कायम स्वरुपी आरक्षण देण्यासाठी राज्य घटनेत दुरुस्ती करणे किंवा मागासवर्गीय आयोगाकडून केंद्रीय मागास वर्ग आयोगाला शिफारस घेऊन मग केंद्रीय मंत्रिमंडळात सादर करणे हाच केवळ यावर मार्ग असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.