असं, कसं?  शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे लोक काँग्रेसच्या वाटेवर? बघा एकनाथ खडसे यांनी नेमका काय दावा केला...

असं, कसं? शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे लोक काँग्रेसच्या वाटेवर? बघा एकनाथ खडसे यांनी नेमका काय दावा केला…

| Updated on: Jul 11, 2023 | 9:29 AM

अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण बदलली आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. अशातच राष्ट्रवादीतील फूटीनंतर शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे.

जळगाव : अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण बदलली आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. अशातच राष्ट्रवादीतील फूटीनंतर शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले का, “मंत्री अनिल पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत, की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला आवाहन करत आहेत. याचा अर्थ असा आहे की अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेले नाही. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. अजितदादांना त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यासोबतही मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न दिसतो आहे. पण दुर्दैवाने अजून तरी त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही.” तसेच पुढे ते म्हणाले की, “अलीकडचं काँग्रेसचं वातावरण पाहता तसेच कर्नाटकमधील विजय लक्षात घेता, काँग्रेसमधून कोणी राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांमध्ये जाईल अशी स्थिती मला तरी वाटत नाही, उलट काँग्रेसमुळे अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी किंवा भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेलं तर आश्चर्य वाटून घेवू नका.”

Published on: Jul 11, 2023 09:29 AM